Press "Enter" to skip to content

वावोशी विभागातील ग्रामस्थांची बैठक

सण – उत्सव, शांततेने शासनाच्या नियमाचे पालन करुन करा : पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचा ग्रामस्थांना मौलिक सल्ला

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

हिंदु संस्कृतीत सण – उत्सवांना खूप महत्व असते.मात्र काही वेळा शासनांने नियम पायदळी तुडविले जात असते. मात्र तसे होता कामा नये,प्रत्येक नागरिकांनी कायदा ,सुव्यवस्था राखली पाहिजे.यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली वावोशी छात्तीसी विभागामधिल ग्रामस्थांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी येणारे सण उत्सव है कसे साजरे कराल या वरती मार्गदर्शन करण्यात आले.

त्याच बरोबर आज ऑनलाईन असो अथवा विविध कारणास्तव होणारे फसवणूक अथवा आपल्या हातातून गुन्हा होवू नये यासाठी आपण सातत्याने जागृत राहिले पाहिजे.यावेळी सायबर क्राईम मार्गदर्शन केले.त्याच बरोबर वाढती लोकसंख्या आणी वाढत जाणारे गुन्हे यावरती तिसरा डोळा म्हणजे CCTV कॅमेरे चौक,बस स्टॅन्ड रिक्षा स्टँड, दुकानदार, ज्वेलर्स, इतर महत्त्वाचे ठिकाणी बसविण्यात यावे यामुळे गुन्हे गारांना तातडीने पकडले जावू शकते अथवा गुन्हे रोखू शकतो.यामुळे प्रत्येक ठिकाणी हे कॅमेरे बसविणे अत्यंत महत्वाचे आहे.

यावेळी या कार्यक्रमास पोलीस पाटील, ग्रामस्थ,पत्रकारमित्र उपस्थित होते. तसेच पोलिस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे, सहाय्यक फौजदार विनोद सुर्वे, पोहवा तुषार सुतार,पोहवा सोनावणे, पोलीस कॉन्स्टेबल नगरकर, गोपनीय अंमलदार समीर पवार असे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.