Press "Enter" to skip to content

जीवना कोळीवाडा येथे रामनवमी

भगवंतांनी शिकवण दिलेला मार्ग अवघड जरी असला तरी तो मार्ग जीवन सुखकर करतो : पालकमंत्री अदितीताई तटकरे

सिटी बेल • श्रीवर्धन • विजय गिरी •

प्रभू रामचंद्राने वानरसेनेला हाताशी धरून रावणावर विजय प्राप्त केला ,भगवंताची शिकवण अवघड जरी वाटत असली तरी असत्याचा मार्गापेक्षा या अवघड मार्गाचा अवलंब केल्यास जीवन सुखकर होते असे प्रतिपादन राज्याच्या राज्य मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी अखंड जीवना कोळीवाडा येथील रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित राहून केले .

यावेळी स भ प सुखानंद स्वामी महाराज, स भ प अरुण कालेकर महाराज ,हरिश्चंद्र पावशे, काशिनाथ चुनेकर, चंद्रकांत वाघे एकनाथ वाघे निवृत्ती वाघे, भारत चोगले ,मोहन वाघे महेश चोगले आदी मान्यवर मंडळी व मोठ्यासंख्येने भाविक उपस्थित होते.

श्री भागवत धर्म प्रसारक श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, श्री स्वानंद स्वामी महाराज व श्री प्रकाशनंद स्वामी महाराज यांच्या आश्रयाखाली पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या 45 वा अखंड हरिनाम सप्ताहात उपस्थित राहता आले याचे याचा मनस्वी आनंद होत आहे .गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेली .या पुढे कुठलेही संकट न येवो अशी मनोकामना अदितीताईनी शेवटी व्यक्त करून सर्वाना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या .रामनवमी सोहळा भेटीनंतर पालकमंत्री अदितीताई च्या हस्ते आसुफ येथील सभागृह दुरुस्त करणे कामाचे तसेच निगडी ते निगडी कोंड रस्ता करणे ,कोलमांडला ते केलेची वाडी रस्त्याचे कामाचे तसेच गडबवाडी येथील स्मशानभूमी व निवारा शेड तसेच बागमांडला येथील बागमांडला दांडा ते कोळीवाडा पथदिव्याची लाईन करणे कामाचे ,वावेलवाडी येथील मुख्य रस्ता ते वावेलवाडी रस्ता करणे कामाचे उदघाटन करण्यात आले .

उद्घाटन समयी त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष दर्शन विचारे .जी प सदस्य प्रगती अदावडे ,पं स सदस्य मंगेश कोमनाक ,तालुका युवक अध्यक्ष सिद्धू कोसबे ,हरेश्वर सरपंच अमित खोत ,तालुका समन्वय अध्यक्ष हिदायत कुदृते बागमांडला सरपंच अनघा भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते .आम्ही सुचवलेली कामे तसेच मंजूर केलेली कामे काहींच्या सांगण्याने केवळ आकसापोटी लोक नाकारत होते ,आता काळ बदलला आहे विकास कामात मागे राहिलेला ग्रामीण भाग आमच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची खात्री झाल्यानेच लोक आमचे गावागावात स्वागत करत आहेत ,याचा अभिमान असल्याचे विविध विकासकांमाच्या उदघाटन समयी बोलताना नाम अदितीताईंनी सांगितले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.