राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अलिबाग येथेराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात निषेध केला. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात घोषणा देत अलिबाग तहसील कार्यालापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट शुक्रवारी आक्रमक झाला हाेता. या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पलफेकही केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला हा हल्ला वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या चित्तावणी खोर भाषणामुळे झाला यांचा निषेध आलिबाग तालुका राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध करण्यात आला व तहसीलदार यांना निषेधाचा पञ देण्यात आले.

यावेळी उपस्थित आलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, युवक अध्यक्ष मनोज शिर्के, हेमनाथ खंडसबळे, मिनाक्षी खंरसबळे,लवेश नाईक, नौशाद पटेल,अरमान शेख,ऋषीकांत भगत , प्रविण रानेवर , शैलेश चव्हाण संजोग पालकर ,सचिन पाटील,रवि पाटील. मोहन काबळे नीलेश नागे , राज ढवळे , हर्ष ढवळे आदीकार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment