शरद पवार यांच्या निवासस्थानवर दगडफेक केल्या प्रकरणी कर्जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडून जाहीर निषेध
कर्जत पोलिस ठाण्यात निवेदन देऊन समाजकंटक यांच्या कठोर कारवाई करण्याची मागणी
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र आंदोलन केली, यावेळी एसटी कामगारांकडून पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये निवेदन देऊन समाजकंटक माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना धुळे, माजी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, सागर शेळके,नगरसेवक शरद लाड, सोमनाथ ठोंबरे, राम कोळंबे, रणजीत जैन, राजेश लाड, बिलाल आढाळ, सोमनाथ पालकर, जगदीश ठाकरे, अनंत निलधे, तेजस राणे, अरुण काळोखे, सुहास वांजळे, महेंद्र चंदन,मल्हारी माने, अमोल देशमुख, जयवंत म्हसे, योगेश गंगावणे, रमाकांत कडू, आदी सह शेकडो कार्यकर्त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी काही समाजकंटक माथेफिरुंनी दगडफेक केली.

मा.न्यायालयाचा निर्णय आल्यावर काही एसटी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असताना काल दगडफेक करण्याचे कारण काय आज पर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीच घडलेले नाही.
महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांच्या घरावर अशाप्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो पोलिसांनी या दगडफेकी मागील करते करवते कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.








Be First to Comment