Press "Enter" to skip to content

प्रशिक फिल्म प्रोडक्शनची निर्मिती

भिमाचे वारसदार या गाण्याचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण

सिटी बेल • रायगड • धम्मशील सावंत •

प्रशिक फिल्म प्रोडक्शन निर्मित भिमाचे वारसदार या गाण्याचे आज आंबेडकराईट नेशन या युट्युब चॅनेल वर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते लोकार्पण केले.
सदरील गाणे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज यांच्या हस्ते लोकार्पण करण्याची इच्छा ही प्रशिक फिल्म प्रोडकशन चे संस्थापक कुंदन जाधव यांची होती आणि बाबासाहेबांचे वारसदार याना शोभेल असे गाणे हे कुंदन जाधव व त्यांचे सहकारी प्रवीण साळुंखे यांनी लिहिले . तसेच गाण्याचे संगी सुद्धा कुंदन जाधव यांनी केले आहे .

आनंदराज साहेब यांना गाणे ऐकवल्या नंतर त्या गे गाणे फार आवडले . तसेच त्यांनी गाण्याचे तसेच प्रशिक फिल्म प्रोडकशन च्या सर्व टीम चे भरभरून कौतुक केले.

कोविड कालावधी मध्ये मागील 2 वर्षे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली नव्हती परंतु या वर्षी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे असे चित्र समाजात दिसत आहे .

सादर गाणे हे झी युवा सिंगर फेम चेतन लोखंडे यांनी गायले असून या गाण्याला व्हिडिओच्या माध्यमातून विशाल कांबळे यांनी कोरिओग्राफ केले. संगीत संयोजन हे सुशील पेंढारी यांनी केले अशी माहिती कुंदन जाधव यानी दिली.
सदर गाण्याचे लोकार्पण हे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झाल्याने आंबेडकरी समाज हे गाणं ऐकण्यास आतुर झालेलं आहे अशी माहिती मिळाली.

या वेळी प्रशिक फिल्म प्रोडकशन चे संस्थापक कुंदन जाधव, आकाश दिलीप कांबळे , ऍड. मनीषा तायडे मॅडम तसेच प्रशिम कला मंच ची सर्व टीम उपस्थित होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.