Press "Enter" to skip to content

सचिव दिलीपदादा जाधव यांनी खेचले राजकीय मानसिकतेचे कान

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या तिसाव्या कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अनेक सेवाव्रतींचा हृद्यसत्कार

सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर •

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे 30 व्या राज्यस्तरीय कामगार कार्यकर्ता शिबीर पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे सुरू झाले. यावेळी कोविड-19 च्या महामारी काळामध्ये कामगारांसह कामगारांच्या कुटूंबियांचे रक्षण करणाऱ्या सेवाव्रतींचा हृद्यसत्कार पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे आणि मान्यवरांकडून करण्यात आला.

यावेळी कोकणात आधी मोठ-मोठे उद्योग येऊ द्यात तरच कामगारांच्या हाताला काम मिळेल, असे आवर्जून सत्कार सोहळयाचे सूत्रसंचालन करणारे महासंघाचे सचिव दिलीपदादा जाधव यांनी कोकणात कारखाना उद्योग होऊ घातला की विरोधाचे हत्यार उपसून आपआपली पाकिटे आणि हप्ते घेण्यास धावलात तर कोकणातील श्रमशक्तीच्या हातांना काम कसे मिळणार, असा सवाल करून राजकीय मानसिकतेचे कान खेचले.

या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन समारंभामध्ये व्यासपिठावर पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड, उपसभापती शैलेश सलागरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे, नवयुग विद्यापिठाचे ऍड. रणजितसिंह जाधवराव, निवृत्त न्यायाधिश जी.एस.बज, कविता कानिटकर मॅडम, जीआरआय टॉवर्सचे संचालक रमेश मस्करन्स, एसबी रिशेलर्स ग्रुपचे सुनील शिरगांवकर, फायझरचे संचालक माधव सावरगांवकर, वाकणचे ग्रामपंचायत सदस्य नारायण साने तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या 30 व्या राज्यस्तरीय कामगार कार्यकर्ता शिबीरानिमित्त कनोक्टिंग डॉट्स संकल्पनेअंतर्गत सेवाव्रती व्यवस्थापन आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करताना एसबी रिशेलर्स ग्रुपचे संचालक सुनील शिरगांवकर, मेनन ग्रुप ऑफ कंपनी रिटायर मॅनेजर एस.बी.शिंदे, इटन फ्लुड पॉवरच्या प्रसन्ना कुमार आणि एचआर हेड कविता कानिटकर, जीआरआय टॉवर्सचे संचालक रमेश मस्करन्स, मिंडा रायडरचे एचआर विजय देसाई, थरमॅक्सचे हेड दिनेश मांदडा, गार्गी हटेन्स अल्बर्टन्स लिमिटेड, मोहन पाले आदींचा यावेळी नगराध्यक्षा सोनल गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी निमंत्रित मान्यवर मार्गदर्शकांपैकी ऍड.रणजितसिंह जाधवराव यांनी, कोविड-19नंतरच्या काळात जे कामगार धोरण बदलले आहे, त्याअनुषंगाने कामगार कार्यकर्ता खरोखरीच प्रशिक्षित होण्याची गरज असल्याचे सांगून श्रमशक्तीचा पुरवठा बेरोजगारीमुळे मागणीपेक्षा अधिक असल्याने सध्याच्या केंद्रसरकारने पुर्वीचे ब्रिटीशकालीन कामगार कायद्यांपेक्षा अधिक वेगळे कायदे आणून कामगार कामगारांमध्ये स्पर्धा निर्माण करून श्रमशक्ती स्वस्त केल्याचे मत मांडले.

यावेळी मराठा महासंघाच्या माध्यमातून ऍड.शशिकांत पवार आणि दिलिपदादा जाधव यांचे विचार ऐकले असल्याने देशात 10 व्या स्थानावर हा महासंघ का आला असेल, यामागील मेहनत आणि कामगारांच्या हिताचा विचार कारणीभूत असणार यात शंकाच नाही, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी उपसभापती शैलेश सलागरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय सलागरे आणि इटन फ्लुड पॉवरच्या एचआर हेड कविता कानिटकर यांनी विचार मांडले. उदघाटनपर भाषणात पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनल गायकवाड यांनी कामगार क्षेत्राच्या शिबिराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवगर्जनेच्या आवाजावर सर्वांनी स्तब्धता पाळली. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे ऍड.विलास चिखले यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मंत्री यांनी आयोजनासाठी सहकाऱ्यांसोबत विशेष लक्ष दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.