बीडखुर्द येथील पोल्ट्री मध्ये शाॅक लागून एका कामगाराचा मृत्यू
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
बीडखुर्द येथील वरदविनायक पोल्ट्री फार्म गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवर्यात सापडली आहे. याठिकाणी पोल्ट्री व्यवसायिक विरूद्ध ग्रामस्थ असा संघर्ष पेटल्याने हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याने हा संघर्ष अधिकच वाढला होता. आता ही पोल्ट्री पुन्हा एकदा वादाच्या कचाट्यात सापडल्याचे पाहायला मिळाले असून ८ एप्रिल रोजी पोल्ट्री मध्ये काम करणाऱ्या ग्रेगोरी सिलबेरियुस तिर्की या कामगाराचा शाॅक लागून मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ केली.
या कामगाराचा मृतदेह अंतिम विधीसाठी छत्तीसगढ येथील त्याच्या गावी पाठविण्यात आले असून या मृत कामगाराच्या कुटुंबाची जबाबदार पोल्ट्री व्यवसायिकाने घेतल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तणाव शांत झाले.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावातील वरदविनायक पोल्ट्री फार्म दुर्गंधीमुळे गेल्या काही वर्षापासून चर्चेचा विषय बनल्याने ही दुर्गंधी बंद व्हावी म्हणून ग्रामस्थांना अनेक आंदोलने करावी लागली असता अखेर प्रशासनाकडून पोल्ट्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर ही व्यवसायिकाकडून पोल्ट्री बंद ठेवण्यात आली असून या पोल्ट्रीचे अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरू असताना 8 एप्रिल रोजी येथील एका कामगाराचा शाँक लागून मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरद विनायक पोल्ट्रीफॉर्ममध्ये कामाला असलेला ग्रेगोरी तिर्की, वय.३१ , मूळ राहणार छत्तीसगड हा तरुण कामगार पोल्ट्री मधील आपले दैनंदिन काम करीत असताना त्याला विजेचा शॉक बसून तो खाली पडला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोल्ट्री मधील अन्य कामगार व व्यवस्थापकांनी सदर तरुणास तातडीने खोपोली येथील रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे सांगितले. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा व मृत व्यक्तींच्या नातेवाईक व अन्य कामगारांचे जबाब नोंदवून पुढील चौकशी सुरू आहे.
पोल्ट्रीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे कामगार नसून माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यामुळे सर्वानी मी माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीव लावत असून ग्रेगोरी याचे शाँक लागून झालेले निधन मनाला धक्काच लावून गेला आहे. परंतु निधन झालेल्या ग्रेगोरी कुटुंबियांचे जबाबदारी मी घेतली आहे. व त्या कुटुंबाला सदैव धीर देण्याचे काम करेन आणि भविष्यात या कुटुंबाला कसलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेईन.
– डॉ. बडगुजर (पोल्ट्री व्यवसायिक)
Be First to Comment