Press "Enter" to skip to content

जिल्हा कार्यकारिणी निवड

रसायनीत भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी निवड

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

भारतीय बौध्द महासभा रायगड जिल्हा (उत्तर )नुतन कार्यकारणी निवड रसायनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पार पडली.

यावेळी निवड प्रक्रिया साठी जगदीश गवई (भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय राष्ट्रीय महासचिव ), भिकाजीं कांबळे (भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र, अध्यक्ष ),सुशील वाघमारे ( महाराष्ट्र सरचिटणीस, रायगड जिल्हा पालक मंत्री ) उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत हि निवड प्रक्रिया झाली.उत्तर रायगड जिल्हा पदाधिकारी निवड ही पुढील तीन वर्षांकरिता असणार आहे.यावेळी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारणीची निवड खालील प्रमाणे करण्यात आली.

अध्यक्ष -विजय गायकवाड, सरचिटणीस -विजय कांबळे, कोषाध्यक्ष -उषाताईं कांबळे, उपाध्यक्ष (संस्कार)-राजेश भालेराव, उपाध्यक्ष (महिला)-सुनंदाताईं वाघमारे, उपाध्यक्ष (प्रचार पर्यटन)-गणेश कांबळे, उपाध्यक्ष (संरक्षण) व कार्यालयीन सचिव -अरुणाताईं शिवशरण, हिशोब तपासनीस -त्रिशिलाताईं सावळे, सचिव (संस्कार)-बंडू कदम,सचिव (संस्कार)-संतोष जाधव,सचिव (महिला)-कमलताईं कांबळे, सचिव (महिला)मनिषाताईं कांबळे, सचिव (प्रचार पर्यटन)दिपक कांबळे, सचिव (प्रचार पर्यटन) -सिध्दार्थ गायकवाड, सचिव (संरक्षण)-रमामाईं गांगुर्डे, सचिव (संरक्षण)-जयेद्रं सावंत,संघटक -संपदाताईं चव्हाण,संघटक -हासूराम कांबळे,संघटक -अनंत गायकवाड,संघटक -नंदाताईं कांबळे यांची निवड करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा उत्तर कार्यकारिणीला मान्यवरांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.