Press "Enter" to skip to content

महिलांना टेलरिंग प्रशिक्षण

लोहोप दांडवाडी येथील आदीवासी महिला वर्ग होणार सक्षम

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

महिला वर्गांने स्वता:च्या पायावर उभे राहावे, महिला सक्षम व्हावे या उद्दात विचारांतून सेवा सोशल सर्विस सोसायटी,यांच्या माध्यमातून लोहोप दांडवाडी येथील अदिवासी महिला वर्गांस शिवण क्लासेसचे प्रशिक्षण देण्याचा मानस या संस्थेनी व्यक्त केल्यामुळे महिला वर्गांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.कारण एखादे काम शिकल्या नंतर रोजगार सहज उपलब्ध होत असतो.या उद्दात विचारांतून महिलांना टेलरिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यासाठी याठिकाणी चार शिलाई मशिन तसेच हा कोर्स तीन महिन्यांचा कालावधीचा असणार आहे. त्यासाठी एक प्रशिक्षक नेमण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अनावरण सोनू सॅम, यांच्याहस्ते करण्यात आले.

महिला वर्ग हा व्यवसाय शिकल्यानंतर त्यांना सहज रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्या संसाराला हातभार लागेल ,असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.यावेळी फादर जस्टिन, लिजोय जोसेफ (प्रोग्राम मॅनेजर)प्रकल्प समन्वयक – मंगेश भंडारे, ट्रेनर मॅडम सपना भंडारे व सहकारी वासंती धांदृत, कांचन सावंत, सूरज कानोजोया आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.