समाजसेवक प्रकाश गायकवाड यांचा गोव्यात “इंटरनॅशनल प्राईम अवार्डने सन्मान
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
पणजी गोवा येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.यात समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांना गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्याहस्ते इंटरनॅशनल प्राईम अवार्ड देवून सन्मानित करण्यात आले.
पणजी गोवा येथे ग्लोबल टुरीझम सुमित अवार्ड प्रदान सोहळा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्याहस्ते पार पडला.
यावेळी विविध राज्यांतील सन्मानकर्तें उपस्थित होते.आपापल्या कार्यातून समाजहित साधणा-या महान कार्यसम्राटांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. यात सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात समाजहिताचे काम करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. समाजसेवेचा वसा घेऊन राज्यात जनतेच्या हितासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृतीचे महान कार्य करत आहेत.त्यांच्या कार्यांची दखल घेतल्याने समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड यांना इंटरनॅशनल प्राईम अवार्डने सन्मानित करण्यात आले.








Be First to Comment