रसायनीतील प्रणव करवले ज्युनिअर स्किल चॅम्पियनशिप स्पर्धेत देशात पहिला
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
आळी आंबिवली – मोहोपाडा येथील कु. प्रणव दीपक करवले याने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) यांच्यावतीने नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या ज्युनिअर स्किल चॅम्पियनशिप या वेब टेक्नॉलॉजी स्पर्धेत आळी आंबिवली -मोहोपाडा येथील कु.प्रणव दिपक करवले याने कौतुकास्पद कामगिरी करून संपुर्ण भारत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात आळी आंबिवली -मोहोपाडा येथील कु. प्रणव दीपक करवले याला मान्यवरांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.यात प्रणवला सन्मानपत्र, सुवर्ण पदक व ₹ 50,000 /- पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.प्रणवच्या या यशाचे सर्वंत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment