वावेघर ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांग व्यक्तिंना धनादेश वाटप
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
ग्रुप ग्राम पंचायत वावेघर यांच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना शुक्रवार दि.8 रोजी धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील 35 दिव्यांग नागरिकांना प्रत्येकी 2060 रुपये धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले.

हे वाटप सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, मा.उपसरपंच विलास माळी, सदस्य- गुरुनाथ माळी ,अशोक गायकर, जगन्नाथ चव्हाण, ज्ञानेश्वर माळी, मनोज पवार, आणि दिव्यांग पुनर्वसन संस्था खालापूरचे अध्यक्ष मंगेश रामदास पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.वावेघर ग्रामपंचायतीकडून धनादेश मिळाल्याने दिव्यांगांच्या चेह-यावर समाधान दिसून आले .








Be First to Comment