तर भाजप कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही : आमदार महेंद्र थोरवे यांचा इशारा
सिटी बेल • रायगड़ • धम्मशील सावंत •
आय एन एस विक्रांत युद्धनौकेचे जतन करण्यासाठी देशभरातून गोळा केलेला निधी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा निल सोमय्या यांनी परस्पर वापरला. या विरोधात आज रायगडात ठिकठिकाणी शिवसेनेने आंदोलन करून निदर्शने केली.
कर्जत येथेही श्रीरामपुल चौकात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या विरोधात घोषणा बाजी शिवसैनिकांनी केली. देशद्रोही किरीट सोमय्या याना अटक होत नाही तोपर्यत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी इशारा दिला आहे.
भाजप कार्यकर्ते हे किरीट सोमय्या यांना मदत करीत असतील तर त्यांना फिरू देणार नाही असा इशाराही आमदार थोरवे यांनी दिला आहे.











Be First to Comment