Press "Enter" to skip to content

पेण फेस्टिव्हलमध्ये मिस रायगड स्पर्धा

कल्याणच्या वृषाली मालावडेकर ला मिस रायगडचा किताब

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिवल २०२२ च्या मिस रायगड या झालेल्या स्पर्धेत कल्याणची वृषाली मालावडेकर हीने मिस रायगडचा किताब मिळावला असून नवी मुंबईच्या सानिया सिंघ हिने या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे तर मुरुड मिठेखारच्या हिमानी गायकर हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले आहे.

या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक नेहा पाटील (पेण), बेस्ट स्माईलचे स्वप्नाली कळमकर (पाली), बेस्ट हेअरचे कल्याणी पाटील (पेण), बेस्ट फोटोजनिकचे धारा विसारीया (डोंबिवली), बेस्ट पर्सनालीटीचे राणी जैसवाल (कामोठे), बेस्ट कॉस्टयूमचे अंजली गायकवाड (मुंबई) या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली आहेत.

या स्पर्धेत एकूण २१ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.पहिल्या फेरीत सर्वानीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले.विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, कोकणातील प्रसिद्ध उद्योजक शामकांत खातू, युवा नेते वैकुंठ पाटील, उद्योजक यशवंत घासे, शर्मिला पाटील, खजिनदार भारती साळवी, स्वररंग उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, देवा पेरवी, सारिका पाटील, अनिकेत साळवी, आदि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.यावेळी पेण मधील असंख्य नागरीकांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.