माणुसकी प्रतिष्ठानतर्फे नव वर्षानिमित्त वायशेत ते अलिबाग बाईक रॅली : माणुसकी प्रतिष्ठानच्या महिला विभागाची स्थापना
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील वायशेत येथील माणुसकी प्रतिष्ठान जितनगर, महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या वतीने मराठी नूतन वर्षांच्या स्वागतासाठी वायशेत ते अलिबाग जोगळेकर नाका येथील श्री काशी विश्वेश्वर पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माणुसकी प्रतिष्ठानच्या महिला विभागाची स्थापना करण्यात आली.

आज दि. 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता माणुसकी प्रतिष्ठान कार्यालय येथे नवीन वर्षाची गुढी उभी करून स्वागत यात्रे ची सुरुवात केली, माणुसकी प्रतिष्ठान ची गुढी रायगड जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या हस्ते करण्यात आली. माणुसकी कार्यालयापासून ते महेश टॉकीज अलिबाग पर्यंत बाईक वरून रॅली काढण्यात आली, यामध्ये पन्नास हुन अधिक माणुसकी महिला सदस्यांचा सहभाग होता.
अलिबाग महेश टॉकीज येथून पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत रॅली आली, यादरम्यान छ. शिवाजी महाराज जयघोष, तसेच झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ विशाल आढाव यांनी गारद बोलून महाराजांचा जयघोष करून स्वागत यात्रेची सांगता करण्यात आली. तसेच यावेळी माणुसकी प्रतिष्ठान महिला विभाग ची स्थापना करण्यात आली.

डॉ. अश्विनी हुलवान यांनी सर्व महिलांना एकत्र येऊन सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले, डॉ. ज्ञानदा फणसे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत आरोग्याची काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्व जनतेने माणुसकी दाखवत सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा व स्वतःच्या घरापासून, परिसरापासून स्वच्छता राखावी याबद्दल आवाहन केले, व संपूर्ण माणुसकी टीमने आजची रॅली पारंपारिक पद्धतीने उत्साहात पूर्ण केली.
या रॅलीमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे,माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, माणुसकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तानाजी आगलावे,सचिव विशाल आढाव,संजय काळेल,डॉ.अश्विनी हुलवान, आदीसाहित प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment