मोहोपाड्यात बंद अवस्थेतील एचओसी काॅलनीत साडेचार किलो गांजा पकडला
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
मोहोपाडा गावाच्या हद्दीत बंद एचओसी काॅलनीमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास रसायनी पोलिसांनी कारवाई करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून साडेचार किलो गांजा जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रसायनी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एचओसी काॅलनीच्या परिसरात इसम गांजा घेऊन आल्याची माहिती मिळाली होती.यावेळी रसायनी पोलिसांनी आरोपी इम्तियाज निकाज अहमद कुरेशी (वय 34)सध्या रा.आळी आंबिवली याला पकडले असता त्याच्या बॅगमध्ये 4 किलो 500 ग्रॅम इतक्या वजनाचा मानवी शरीरावर परिणाम करणारा पदार्थ गांजा हा अंमली पदार्थ 1,12,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आपले कब्जात बाळगल्यास स्थितीत मिळून आला.
“रायगड पोलिस सर्ववेळ सर्वांसाठी”या उक्तीप्रमाणे रसायनी पोलिस ठाण्याचा वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा कार्यभार कैलास डोंगरे यांनी स्विकारताच परिसरात गुन्हेगारांवर वचक मिळविली आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सर्ववेळ नागरिकांच्या पाठीशी उभे आहेत.शिवाय सर्वत्र शांतता राहून गुण्यागोविंदाने नागरिक नांदो यासाठी गुन्हेगारीवर अंकुश आणण्याचे महत्त्वाचे काम वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली होताना दिसत आहे.
मोहोपाडा येथील बंद एचओसी काॅलनीमध्ये गांजा विकणा-यास रसायनी पोलिसांनी मालासह ताब्यात घेतले. हि कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे , सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक मंगेश लांगी, पोलिस नाईक पाटील यांनी केली.सदरबाबत आरोपींविरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवयावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 कलम 8(क)20 बंद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी इम्तियाज निकाज अहमद कुरेशी यांना शनिवार दि.2 रोजी खालापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील तीन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत पुढील अधिक तपास रसायनी पोलिस करीत आहेत.
Be First to Comment