Press "Enter" to skip to content

रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

रायगड प्रेस क्लब चा १७ वा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा माणगाव येथे

सिटी बेल • रायगड •

रायगड प्रेस क्लब चा १७ वा वर्धापनदिन व पत्रकारांनी केलेल्या कामाबद्दल त्याना पुरस्कार देऊन गौरवण्याचा कार्यक्रम रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता माणगांव येथे संपन्न होणार आहे.

माणगाव प्रेस क्लब व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे विश्वस्त , किरण नाईक, कोकण विभाग सचिव विजय मोकल, रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष भारत रांजणकर , यांसह आमदार खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याच सोहळ्यात पत्रकारांनी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल त्याना विविध पत्रकारांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यात
१) आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार अजित वरपे , संपादक दैनिक झुंजार नेता, बीड,
२) रायगड प्रेस क्लबचा पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार – विजय मांडे – कर्जत,
३) जिल्हास्तरीय स्व. निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार – मेघराज जाधव (मुरुड),
४) स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भिड पत्रकार पुरस्कार – प्रफुल्ल पवार (अलिबाग),
५) संतोष पवार स्मूती युवा पत्रकार पुरस्कार
हरेष मोरे ( माणगाव ),
६) सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार- सीमा मोरे (पोलादपूर),
७) उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार- प्रकाश माळी (पेण ), व प्रसाद पाटील ( महाड ), त्याचबरोबर श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार१) आनंद पवार (रसायनी ), २) एस टी पाटील (खालापूर )
३) संतोष शिलकर ( श्रीवर्धन )
४) नंदकुमार मरवडे (रोहा) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी रायगड सह इतर जिल्ह्यातून ही पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन माणगाव प्रेस क्लब करत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.