Press "Enter" to skip to content

गुढी पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

अवघ्या काही तासांवर मराठी नव वर्षाला सुरवात होणार नागरिकांनी खरेदीचा आनंद घेत आहेत.
बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे.

चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होत आहे. घरोघरी देवादिकांची पूजा करून पंचांगाची पूजा करण्यात येते. विशेष म्हणजे या शुभ मुहूर्तावर नागरिक नवीन वस्तू खरेदी करतात. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल वस्तूंसह कापड बाजार, सोन्या-चांदीच्या पेढ्याही सजल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी धार्मिक पुस्तके, तोरण, खण, साड्या, रेशमी वस्त्र, गुढीसाठी कळक, साखरेची गाठी, रेडिमेड गुढी, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती.

पूजेकरिता जेजुरीवरून आलेला दवणा, आंब्याच्या डहाळ्या आणि विविध प्रकारची फुले फुलबाजारात आली आहेत. धार्मिक पुस्तकांच्या दुकानांतही धार्मिक विधी, व्रत वैकल्याच्या पुस्तकांकरिता नागरिकांकडून विचारणा होत होती. मिठाईच्या दुकानदारांकडे आवडत्या पदार्थांच्या ऑर्डर्सही नागरिक देत होते.
‘‘गुढीपाडव्याकरिता दोन महिने अगोदरच दुकानदारांना तयारी करावी लागते. चैत्र महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंती असते. साहजिकच पूजा साहित्याची लाखोंची उलाढाल होते. अनेकांना रोजगारही मिळतो,’’ असे विक्रेते यांनी सांगितले.
……

सकाळी साडेआठनंतर उभारा गुढी
शनिवारी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होत असून, ब्रह्मध्वजाय नमः म्हणून गुढी उभारावी. पंचांगावरील गणपतीच्या चित्राचे पूजन करावे. हिंदू नववर्षाला संस्कृतमध्ये संवत्सर असे म्हणतात. अशी एकूण साठ संवत्सरे आहेत. कालगणनेनुसार गुरू ग्रहाचा भ्रमण कालावधी बारा वर्षांचा असतो. अशी पाच आवर्तने पूर्ण झाली की बासष्ठ वर्षे पूर्ण होतात.

पाडव्यानिमित्त वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहक चौकशीसाठी शोरूममध्ये येत आहेत. गुढीसाठी शहरातील महावीर चौक ते जोगळेकर नाका या दरम्यान फुलांचे ढीग लागले आहेत. 160 ते 200 रुपयांप्रमाणे या फुलांची विक्री होत आहे. अमावस्येआधी गुढीची काठी नेण्याची प्रथा असल्याने तसेच विकेंड लॉकडाउनमुळे आजच बांबूची काठी व इतर साहित्य नेण्याकडे अनेकांचा कल होता.

बांबूच्या काठीचा दर हा 100 पासून 200 पर्यत आहे.शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. एका माळेची किंमत 20 ते 50 रुपये आहे. गुढीसाठी ब्लाऊज पीस, साडी अशी वस्त्रे वापरली जात असली तरी खास गुढीसाठी भरजरी आणि जरीकाठेच्या साड्या बाजारात आल्या आहेत.

मिनी गुढी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी मिनी गुढी खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिनी गुढीची मागणी वाढत आहे. ही गुढी साधारण 150 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. गुढीची साडीही रेडिमेड गुढी उभी करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. साडीचा वापर करताना तिची व्यवस्थित घडी घालणे आवश्‍यक असते. गडबडीच्या वेळी वेळ वाचविणारी तसेच गुढीला शोभणारी डिझायनर गुढीची साडी सध्या बाजारात उपलब्ध आहे. जरी, कॉटन अशा प्रकारात साडी उपलब्ध असून ती 200 ते 250 रुपयांमध्ये मिळते. या डिझायनर साडीलाही महिला वर्गाची मोठी पसंती मिळते आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.