Press "Enter" to skip to content

वडगांव ग्रामपंचायतीचा विकासकामांचा धडाका

सरपंच गौरी गडगे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे उद्घाटन

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील वडगांव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे सुरू असल्याने परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

वडगाव वाशिवली रस्त्यावर सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असल्याने या रस्त्यावर सोलर स्ट्रीट लाईटची मागणी होत होती.अखेर सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या प्रयत्नातून मे.एस.एच. केळकर कंपनीच्या सी.एस.आर निधीतून ग्रामपंचायत हद्दीतील वाशिवली ते वडगांव रस्त्यालगत बसविण्यात आलेल्या सोलर स्ट्रीट लाईटचे उदघाटन करणेत आले .तसेच रा.जि.प शाळा वडगांव येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजीटल स्क्रिन व शैक्षणिक सॉफ्टवेअर चे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच गौरी महादेव गडगे , ग्रामपंचयत सदस्य सरिता संतोष गडगे , वर्षा संतोष पाटील ,कल्पना मदन ठोंबरे ,चंद्रकला परशुराम वाघमारे , महादेव कमलाकर गडगे ,नंदकुमार दत्तात्रेय पाटील ,मदन ठोंबरे तसेच कंपनीतर्फे कोपरकर साहेब ( एच . आर . हेड ) ,सदानंद भिडे साहेब ( जनरल मॅनेजर व युनिट हेड ) , संदीप शिर्के ( सिनियर मॅनेजर – एच . आर व ॲडमिन ) ,अडसुळे साहेब ( सिनियर मॅनेजर – इंजिनियरिंग ) , वासुदेव पांडूरंग कनोजे ( एक्झेक्युटिव – एच . आर व अॅडमिन ) ,प्रतिक मनोहर ( नवनीत प्रकाशन ) त्याचप्रमाणे ग्रामपंचायत वडगांव कर्मचारी , शिक्षक वर्ग , विद्याथ्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायतीचे इंजिनियर विजय हरिश्चंद्र चौधरी यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.