शिवरामभाऊ शिंदे, महेंद्र हंबीर, साजिद अधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे विभागातील नेते शिवरामभाऊ शिंदे यांची रोहा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी व वणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच युवा नेते आदिवासी समाजाचे नेते महेंद्र हंबीर यांची रोहा तालुका समन्वय सदस्यपदी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब अधिकारी व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या आशीर्वादाने नागोठणे येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते साजिद आधिकारी यांची रोहा तालुका दक्षता सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान संजय गांधी निराधार योजनेचे पद हे गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी असते आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते शिवरामभाऊ शिंदे हे त्यांना मिळालेल्या पदाचा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी उपयोग करतील असा विश्वास व्यक्त करून तुम्ही पक्ष कार्यासाठी सर्वत्र फिरत असलात तरी मी घरात बसून जे काम करीन ते निश्चितपणे आपल्या पक्षाच्या युवकांसाठी फायद्याचे असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्रशेठ जैन यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या सत्कार सोहळ्याच्या वेळी नरेंद्रशेठ जैन यांच्या समवेत भाई टके, डॉ. राजेंद्र धात्रक, हरीशशेठ काळे, विलास चौलकर, बाळासाहेब टके, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, प्रकाशशेठ जैन,अनिलशेठ काळे, रियाजशेठ आधिकारी, चंद्रकांत गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विनायक गोळे, विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, राजेश पिंपळे, माजी उपसरपंच सुनील लाड, बिपीन सोष्टे, जवरुद्दीन सय्यद, मंगेश तेरडे, मनोज टके, दिपेंद्र आवाद कुणाल तेरडे, अक्षय नागोठणेकर, केतन भोय, मंदार चितळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठणे विभागातील महिला नेत्या सुजाता सुधाकर जवके यांची रोहा तालुका दक्षता समिती सदस्यपदी व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जानू कोकरे यांचीही रोहा तालुका दक्षता समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.
नरेंद्रशेठ जैन पुढे म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हे पद फार महत्वाचे असून या पदामुळे समाजसेवा करण्याची एक नामी संधी आपल्याला प्राप्त होते. गरीब, निराधार, अपंग लोकांना शासकीय मदत मिळवून देण्याचे हे पद एक माध्यम आहे. शासकीय मदत मिळवून देणे हे एक जिकरीचे काम असते. शासकीय मदत मिळवून देताना कागद पत्रांची काटेकोर पद्धतीने उपाययोजना करावी लागते त्यानंतरच ही मदत मिळते. अध्यक्षपद घेणे हे सोपे आहे परंतु त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करून देणे हे अवघड काम असले तरी शिवरामभाऊ शिंदे हे त्यांच्याकडे असलेला अनुभव व अभ्यासुवृत्तीमुळे अध्यक्षपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळतील यात काडीमात्र शंका नाही. आपल्याला मिळालेल्या पदाचा नागोठणे विभागातील गरीब गरजू लोकांना लाभ मिळवून द्या अशी विनंती यावेळी नरेंद्रशेठ जैन यांनी शिवरामभाऊ शिंदे यांना केली.
संजय गांधी निराधार योजनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे म्हणाले की, आपले नेते खासदार सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने, नामदार अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने माझी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मला मिळालेल्या संधीचे मी सोने करून दाखवीन असा विश्वास यावेळी शिवरामभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला.
आमचे नेते खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आशीर्वादाने माझी रोहा तालुक समन्वय समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असुन मी त्या पदाच्या माध्यमातुन माझ्या नागोठणे विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असा विश्वास वणी ग्रामपंचायत उपसरपंच आदिवासी समाजाचे नेते महेंद्र हंबीर यांनी व्यक्त केला.
जिल्हा काँग्रेसचे नेते बाबासाहेब अधिकारी व काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या आशीर्वादाने माझी रोहा तालुका दक्षता समिती सदस्य पदी निवड झाली असून या निवडीमुळे मला मिळालेल्या संधीचा मी नागोठणे विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग करीन असा विश्वास यावेळी साजिद अधिकारी यांनी व्यक्त केला.








Be First to Comment