ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्राम पंचायत वडगांव या ग्रामपंचायतीला आदर्श पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतीचे सरपंच गौरी महादेव गडगे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याची दखल घेऊन नवराष्ट्र टीम कडून अलिबाग येथे पालकमंत्री अदीतीताई तटकरे यांच्या हस्ते आणि आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थतीत सम्राट सरपंच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विनोदी कलाकार भाऊ कदम उपस्थित होते. अनेक ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांना पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते मात्र ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांची दखल कोणीही घेत नसल्याने अश्या कार्यासम्राट सरपंच आणि उपसरपंच यांना सन्मानित करण्याचे काम नवराष्ट्र टाईम्स ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
हा आगळावेगळा कार्यक्रम अलिबाग येथे घेतला असून या कार्यक्रमात खालापूर तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच गौरी गडगे यांना सम्राट उपसरपंच हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.आहे सरपंचगौरी गडगे यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात अनेक विकासकामे आणून ती पूर्ण करीत जनतेची अनेक समस्यांमधून सुटका केली तसेच विविध विभागातून निधी उपलब्ध करून आपली ग्रामपंचायत तालुक्यात उत्तम ग्रामपंचायत कशी होईल याकडे जास्त लक्ष दिले आहे.
नागरिकांनी निवडून दिल्यानंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम केले आहे मी जास्त काही नाही केलं परंतु याच कार्याची दखल आयोजकांनी घेतली असल्याने हा पुरस्कार माझ्या नागरिकांना समर्पित करतो केले असे माध्यमांशी बोलताना सांगितले.








Be First to Comment