Press "Enter" to skip to content

आवरे येथे शरीर सौष्ठव स्पर्धा

“रायगड श्री” रायगड जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२ उत्साहात संपन्न

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

प्रत्येकाने निरोगी, निकोप आयुष्य जगावे, आरोग्य विषयक जनजागृती व्हावी या दृष्टीकोणातून रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व भाई नित्यानंद म्हात्रे आवरे ,उरण. पुरस्कृत जिल्हा स्तरीय  हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा रायगड श्री २०२२,रायगड फिजिक २०२२,व रायगड श्रीमान २०२२ कोविड नियमांचे काटेकोर पणे पालन करून जिल्हा परिषद शाळा, आवरे, तालुका उरण येथे मोठ्या थाटामाटात पार पडल्या. रायगड हेल्थ सेंटर उरणचा अजित वामन म्हात्रे रायगड श्री २०२२ चा मानकरी ठरला.बेस्टपोझर चा सन्मान कान्होबा जिम उरणचा शुभम परशुराम म्हात्रे याला मिळाला.

भाई नित्यानंद म्हात्रे, अभिजित पाटील, सुदाम पाटील,प्रभाकर म्हात्रे अन्य मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.विनोद म्हात्रे, जीवन गावंड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.पंच म्हणून सर्वश्री सुरेंद्र महाडिक, भगवान सावंत, जितेंद्र गुरव, विक्रांत पाटील, सुरेश परदेशी,परेश मोकल,संतोष साखरे व नितीन घरत यांनी काम पाहिले.स्पर्धेचे गुणलेखन परेश मोकल, महेश रुईकर यांनी केले.स्पर्धेचे सुत्रसंचलन संतोष साखरे तर स्टेज मार्शल म्हणून जितेंद्र म्हात्रे व दिपक शिंदे यांनी काम पाहिले.स्पर्धेचे टेक्नीकल डायरेक्टर संघटनेचे सचिव संतोष साखरे होते.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत रायगड श्री २०२२ पहिल्या गटात प्रथम क्रमांक हनुमान राघु जाधव तुषार फिटनेस पनवेल, दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक अजित वामन म्हात्रे रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली, तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक संकेत संजय वर्तक रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली, चौथ्या गटात प्रथम क्रमांक प्रसाद चंद्रकांत सुतार गुरुकुल व्यायाम शाळा अलिबाग, तर रायगड फिजिक २०२२ पहिल्या गटासह प्रथम अनिकेत पाटील आर ऍण्ड जे फिटनेस मोठी जुई, दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक गोकुळ नरेश कुवर वनलाईफ फिटनेस पनवेल व रायगड श्रीमान २०२२ मध्ये प्रथम क्रमांक भूषण सुभाष माळी पावर हाऊस जिम आनंदनगर उरण यांनी बाजी मारली.

आवरे सारख्या ग्रामीण भागात या स्पर्धेचे आयोजन केल्याने ग्रामीण भागातील शरीर सौष्ठव स्पर्धकांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले असल्यामुळे स्पर्धाकामध्ये आनंदाचे वातावरण होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.