सुक्या लाकडांचा कुटुंबाला आधार, लाकडे विकून उदार निर्वाह
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
महागाईने कहर केला असून घरखर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळले आहे. त्यामुळे चुलीसाठी लागणार्या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे.चुलीवर शिजवलेल्या जेवणाची लज्जत औरच असते. शिवाय घराचे बजेट जुळवण्यासाठी या परिसरात अनेक घरांमध्ये चुलींवर स्वयंपाक होताना दिसत आहे. या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्या आदिवासी महिला खालापुर तालुक्याच्या परिसरात दिसत असून हेच त्यांच्या रोजगाराचे साधन बनले आहे.
गेले अनेक दिवस घरीच असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे जंगलाचा राजा मदतीला धावत आहे.यामुळे जंगलात असलेले लाकडे हेच त्यांचे उपजिवीकेचे साधन निर्माण झाले.महागाईमुळे गॅस परवडत नसल्याने स्वयंपाक करण्यासाठी सुक्या लाकडाचा वापर करीत आसल्याने, आदिवासी समाज यांना रोजगार मिळत आहे.
या सुकलेल्या लाकडांची मोळी १५० ते २०० रूपयांपर्यंत विकत असून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. लाकडे विकून आदिवासी महिलांना वर्षातील ८ महिने रोजगार मिळत असतानाच महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना यामुळे दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच महिन्याचे कोलमडलेले बजेट सांभाळताना करावी लागणारी तारेवरची कसरतही यामुळे कमी होत आहे.








Be First to Comment