सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
खालापूर तालुक्यातील नडोदे ग्रामपंचायत हद्दीतील निगडोली गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसरी येथील शिवतीर्थ निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, यामुळे प्रस्थापितांना धक्का बसल्याचे दिसून आले.
निगडोली येथील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, स्थानिक प्रस्थापित नेत्यांनी सदर कार्यकर्त्यांची दिशाभूल केल्याने त्यांनी पुन्हा शिवसेनेत वापसी केली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनीही सदर नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीला राम राम केल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असल्याचे पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, रमेश फराट, सदानंद पाटील, कृष्णा राऊत, अक्षय मुंडे, राम जाधव, गणपत पाटील, नागेश पाटील, चंद्रकांत मुंढे यांनी प्रवेश केला.
यावेळी, नगरसेवक संकेत भासे, कर्जत युवासेना उपतालुकाधिकारी प्रसाद थोरवे, जिल्हा युवा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुकाधिकारी महेश पाटील, युवासेना विभागप्रमुख रोहित पाटील, गटप्रमुख विनोद फराट, पंचायत समिती विभागप्रमुख तेजस पाटील, माजी उपसरपंच पंढरीनाथ ठोंबरे, शाखाप्रमुख ऋषिकेश पाटील,युवा सेना उपाध्यक्ष – संजय फराट, निगडोली उप शाखा प्रमुख – मुरलीधर ठोंबरे,अशोक पाटील,
ग्राम पंचायत नडोदे युवा सेना अध्यक्ष – कैलास फराट ,निगडोली युवा सेना अध्यक्ष – अरुण पाटील मनोहर पाटील, जयवंत पवार ,दिनकर फराट, दिनेश ठोंबरे, महेंद्र सुर्वे, रामदास पाटील, चंद्रकांत फराट, सुभाष पवार, सदानंद भालीवडे, बबन चव्हाण, संतोष शिंदे, सुधीर पवार, संजय ठोंबरे, राजकुमार पाटील, अतुल पाटील, , नितीन पाटील, हनुमंत फराट आदिमान्यवरांसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment