Press "Enter" to skip to content

माणुसकी अजूनही जिवंत आहे…

मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, पैशाची बॅग केली परत

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

चांभार्ली येथील कौतुभ जगताप यांचा दूध व्यवसाय असून ते चांभार्लीहून आपल्या स्कुटीवरुन बॅकेत पैसै भरणा करण्यासाठी रस्त्याने जात असताना नकळत त्यांची बॅग रस्त्याच्या कडेला पडली.ते यावेळी सेबी वळणावर एच डिएफसी बॅकेसमोर आल्यानंतर आपली पैशाने भरलेली एक्कावन्न हजार रुपये रोखीची हरविल्याचे लक्षात आले.याचवेळी सदर बॅगकडे रिक्षाचालकाचे लक्ष गेल्याने त्याने रिक्षा बाजूला करून पाहिले असता त्या बॅगेत 51 हजार रुपये नोटांचे बंडल आढळले. यावेळी रिक्षाचालक आदम शेख यांनी पैशांची बॅग घेऊन संगटनेचे उपाध्यक्ष फुलचंद लोंढे यांना फोनवरून माहिती देवून माहिती दिली.

यावेळी बॅगेत पाहिले असता 51000 हजार रोख होते. आणि बँकेची स्लिप होती. त्यामध्ये नोटांची प्रकार लिहिले होते त्यामुळे त्यांनी ब्यागेला काही न करता तसेच ठेवून आमच्या रिक्षा चालक-मालक संघटनेचे वरिष्ठांना त्यांनी ताबडतोब कळवले आणि सर्व ग्रुपवरती त्यांनी याची माहिती पाठवली.

टाके देवी रिक्षा चालक मालक संघटनेचे स्टँड प्रमुख किरण पवार यांच्या प्रयत्नाने ज्या वक्तीची पैशाची बॅग हरवली होती त्यांचा पर्यंत पोहोचवण्याचे काम किरण पवार यांनी केले.आदम शेख हे प्रामाणिक असल्याने त्यांनी त्याठिकाणी त्यांची इमानदारी दाखवून दिली व ती पैश्याची रोख रकमेच्या खात्री करून त्या कौस्तुभ जगताप यांना ती परत केली . कौस्तुभ जगताप यांनी आदम शेख व टाकेदेवी रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व रिक्षा चालकांना धन्यवाद दीले व त्यांचे आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.