मुरूड पोलीस ठाणे हद्दीत तीस वर्षीय महिलेवर बलात्कार
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
रायगड जिल्ह्यातील मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दीपक पाटील व महेंद्र नाक्ती यांस पोलिसांनी अटक केली असून ह्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला आणि बलात्कार करणारे आरोपी हे एकाच गावातील आहेत.दिनांक 12/03/2022 रोजी 12:30 वा. ते दि. 14/03/2022 रोजी 12:30 वा.दरम्यान आरोपीत नं. 01 याचे घर फिर्यादी घराशेजारी आहे. दीपक पाटील याचे व पीडित महिला यांच्यात प्रेम संबध होते त्याबाबतचे पुरावे दीपक पाटील याने सर्वाना दाखविन असे वारंवार सांगून फिर्यादीस धमकवित होता.
त्याच्या धमकीला कंटाळुन पीडित महिलेने आरोपी 01 यास तुझ्याकडे काय पुरावे आहेत ते दाखव असे म्हणाली त्यावर आरोपी नं.01 याने फिर्यादीस तु माझ्याशी शारिरिक संबंध ठेवले तरच मी तुला पुरावे दाखविन नाहीतर मी ते पुरावे लोकांना दाखवुन तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली होती.
त्यानंतर दिनांक 12/03/2022 रोजी दुपारी 12.30 वा.आरोपी 1 हा फिर्यादीच्या घरात जावून फिर्यादी ही बेडवर झोपली असताना फिर्यादीच्या जबरदस्तीन अंगावर झोपुन तु ओरडलीस तर मी तुझे व माझे प्रेम संबंधाचे पुरावे सगळयाना दाखविन तुझे लग्न होवु देणार नाही असे धमकावित फिर्यादीवर बळजबरी संभोग केला याबाबत तु कोणाला काही एक सांगितले तर तुला व तुझ्या आई वडिलांना ठार मारीन अशी धमकी दिली त्याचप्रमाणे दिनांक 14/03/2022 रोजी दुपारी 03.30 वा सुमारास यातील आरोपीत नं 02 हा फिर्यादी या घरात एकटी असताना घरी आला व त्याने त्याच्या कडील मोबाईल काढुन त्यामध्ये फिर्यादी व आरोपी नं 01 यांच्यात झालेल्या शारिरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप दाखवुन तू माझ्या सोबत देखिल असे संबंध ठेव नाहीतर मी सदरचा व्हिडीओ व्हायरल अशी धमकी दिली त्यास फिर्यादी याने विरोध केला. त्यावेळी आरोपी नं.02 यांने फिर्यादीस जबरदस्तीने हॉलमधील बेडवर ढकलुन खाली पाडले व जबरदस्तीने फिर्यादी सोबत जबरी संभोग केला.
सदर बाबत फिर्यादीने तिचे आई वडील शतावरून परत आले नंतर त्याना घडलेला प्रकार सांगीतला त्यानंतर फिर्यादी यांची मनस्थीती अस्थीर होती झालेल्या प्रकारा बाबत फिर्यादीच्या आई वडीलानी फिर्यादीस भावास बोलावून घेतल्यानतंर त्याना घडलेली हकीगत सांगीतल्यानंतर त्यानी फिर्यादीस धीर दिला. याबाबत महिला विभागाकडील पत्रक क्रमांक जावक क्रमांक महिला विभाग/गुन्हा दाखल/2022-321 दिनांक 24मार्च व2022नुसार प्राप्त झाल्याने मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील 02 आरोपीत यांस दिनांक 24/03/2022 रोजी 20:45 वा.सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 38/2022 भा.दं.वि.क. 376 , 506, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66 e प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपाससुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजन जगताप हे करीत आहेत.
Be First to Comment