Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी उमाताई मुंढे

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रसायनीतील राजिप महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई संदिप मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात निवडपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजियाताई खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्यां उमाताई संदिप मुंढे यांची निवड करण्यात आल्याने जिल्ह्यातील महिला वर्गात नवचैतन्य संचारले आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उमाताई संदिप मुंढे कार्य करणार असल्याचे दिसून येते.त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.