वाढदिवसानिमित्त तळेगाववाडी रा.जि.प.शाळेला काॅम्प्यूटर भेट
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
युवा उद्योजक नितीन जगे यांच्या वाढदिवसानिमित्त वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी येथील रा.जि.प.शाळेला काॅम्प्यूटर भेट देण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मांडे सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन त्यांचा सन्मान केला.गोरगरिब विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण घेता यावे यासाठी नितीन जगे यांच्या वाढदिवसानिमित्त एनजे फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये १०० काॕम्प्युटर भेट देण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले.
कोविड-१९ नंतर डिजीटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी,संगणकीय ज्ञान असणे गरजेचे झाले आहे आणि म्हणूनच गोरगरिब-आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची क्रांती पोहोचावी यासाठी एनजे फाऊंडेशनचा हा सामाजिक उपक्रम आहे.

या कार्यक्रमासाठी गिरीष पाटील, विनोद कडव, जितेश किर्दकुडे , नंदकुमार मुकादम, गोविद पाटील, अशोक पाटील, अनंत म्हाञे ,रितेश सुर्वे,धनाजी पाटील, हरी कोंडीलकर , दिपक ठाकुर, मंदार वेदक ,राजेश खराळ, गुरूनाथ मांडे ,सुनिता म्हाञे आदी पालक वर्ग यांचे आभार मानून कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेय मुख्याध्यापक सुरेश मांंडे व शिक्षक वर्गांने अथक परिश्रम घेतले.








Be First to Comment