Press "Enter" to skip to content

ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन्स क्लबचे विद्यार्थी

रसायनीतील विद्यार्थ्यांचे चिपळूण येथे क्रिडा स्पर्धेत सुयश

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

रसायनीतील ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी चिपळूण येथे क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश संपादन केले आहे.

डेरवण युथ गेम्स स्टेट मीट २०२२ मध्ये 4*100 मीटर रिले ,वयोगट १२ वर्षांखालील मुले विभागात रौप्य पदक जिंकून एक बेंच मार्क सेट केला.या संघात कु.आयु अमोल गीध ,कु.दर्शन सचिन करवंदे ,कु.प्रेम तिप्पण्णा जाधव , कु. भैयालाल पासवान,महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना खडतर स्पर्धा देऊन त्यांनी एक अप्रतिम शर्यत पार पाडली.

यात निहिरा दिगंबर गीध – 30 मीटर, 50 मी – उपांत्य फेरी
2. आर्वी अनिरुद्ध गीध – 30 मीटर 50,मीटर उपांत्य फेरी
3. अन्वय समीर मोरे – 100 मीटर, 150 मीटर उपांत्य फेरी
4.दर्शन सचिन करवंदे – लांब उडी फायनलिस्ट
5. आर्य रामचंद्र पाटील – 60 मीटर, 100 मीटर उपांत्य फेरी
6.चैतरंग सचिन मालकर 60 मीटर, 100 मीटर उपांत्य फेरी
7.रुद्र मंगेश पाटील – 60 मीटर, 100 मीटर उपांत्य फेरी
8. सुजल दत्तात्रय घरत – 800 मीटर फायनलिस्ट

या क्लबचे प्रशिक्षक गुरुनाथ घनश्याम म्हशीलकर (एनआयएस इन अॅथलेटिक्स, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग एक्सपर्ट, बीपीईडी) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.