Press "Enter" to skip to content

सारीका व संजय सांगले यांचे प्रयत्न

लोधिवली ग्रामपंचायतीकडून आदीवासी महिलांना शिलाई मशीनचे वाटप

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

लोधिवली येथील सारीका सांगले व संजय सांगले यांच्या प्रयत्नातून तसेच ग्रामसेवक व प्रशासक यांच्या मार्गदर्शनाने लोधिवली ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून आदीवासी महिलांना मर्फिच्या फुलशेटर शिलाई मशिन पोलिस पाटील किरण पाटील व शिवणकाम शिक्षिका सारिका संजय सांगले यांच्याहस्ते वाटप करण्यात आल्या.

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी महिलांना शिलाई मशीन मिळाल्याने त्यांना रोजगारासाठी कमाईंचे साधन उपलब्ध झाले आहे. शिलाईं मशिनवर कपडे शिलाई करुन आमच्या कुटुंबाचा गाडा चालवू असे शीलाई मशिन मिळालेल्या महिलेने सांगितले.

यावेळी लोधिवली गावचे पोलिस पाटील किरण पाटील,शिवण क्लास शिक्षिका सारिका संजय सांगले ,संजय सांगळे आदींसह ग्रामसेवक व प्रशासक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.