समाज प्रबोधन करताना अद्ध्यात्मिक बरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे : हभप. भिकाजी महाराज
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
समाजाची सेवा करताना,शिक्षणाला अद्ध्यात्मिक व वैद्न्यानिक शिक्षणाबरोबर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,तरच शाश्वत विकास होईल,असे प्रतिपादन जेष्ठ कीर्तनकार, भगवान श्रीसद्गुरू गणेशयोगीराज महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप. भिकाजीमहाराज कदम यांनी केले.
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावंढळ येथे भगवान श्रीसद्गुरू गणेशयोगिराजमहाराज वारकरी संस्था यांच्या वतीने वावंढळ शाळेच्या पटांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तीन स्मार्टटीव्ही,शाळेस व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,विद्यार्थी यांना खाऊच्या वाटपाबरोबर दुपारचे जेवण दिले.
त्याप्रसंगी हभप.भिकाजीमहाराज बोलत होते.ते पुढे म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शैक्षणिक प्रगती झाली तरच देश विकासाच्या मार्गावर दिसेल.कोरोना काळात पंतप्रधान निधी व मुख्यमंत्री निधीला या संस्थेने भरघोस मदत केली आहे.तर कोरोना काळात ग्रामीण भागात मास्क,सॅनिटाईझर वाटप,आर्थिक मदत केली असून वेसनमुक्ती व स्वच्छता मोहीमसाठी गावोगावी भ्रमण दिंडी काढली जाते.आतापर्यंत १२० भ्रमण दिंड्या काढण्यात आल्याचे संस्थेचे सचिव हभप.सुभाष सावंत यांनी सांगितले.आयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराला देखील आर्थिक मदत केली आहे.
या संस्थेत डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, उच्चपदस्थ असून सर्वात जास्त तरुण वारकरी संप्रदायाचे आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप. रामचंद्रमहाराज होते.शाळा डिजिटल करताना व शाळेच्या इमारतीच्या दुरुस्ती साठी देखील मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
कार्यक्रमास हभप.बळीराम कदम,जेष्ठ नागरिक शिवरामराव कदम,हभप. पांडुरंग कदम,दत्ताजी कदम,परशुराम कदम,शाळा समिती अध्यक्ष सौ.पवार,मुख्याध्यापक बाविस्कर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, वारकरी संप्रदायाचे लोक,संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment