खोपोली येथे सत्याहत्तर हजार किंमतीचा गांजासहित दोन लाखाची कार जप्त : आरोपीस अटक
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
रायगड जिल्हयातील खोपोली येथे हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला (वय-32 वर्ष रा.आशियाना बिल्डींग, चौथा मजला, प्लॅट नंबर 401, खोपोली बाजारपेठ,ता.खालापूर ) यांच्याकडून रु.76 हजार700 किंमतीचा 6.394 किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई ही गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या पथकाने केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी खालापूर विभागागाकडे अवैध धंद्याचे अनुषंगाने गस्त करीत असताना पथकातील पोलीस हवालदार राजेश पाटील यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मौजे मुळ गाव खोपोली गावच्या हद्दीत अखंड खोपोली हनुमान मंदिराचे समोर इसम नामे हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला (रा.खोपोली, ता.खालापूर) यास त्याच्या ताब्यातील वॅगनआर कारसह ताब्यात घेतले असता सदर गाडीमध्ये 6.394 किलो ग्रॅम वजनाचा एकूण 76,700/-रुपये किमतीचा मादक अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. तसेच 2,00,000/-रुपये किमतीची वॅगनआर कार (क्र.एम.एच.01 BE 0282)जप्त करण्यात आली आहे.
सदर इसमाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदरचा गांजा स्थानिक पातळीवर विक्री करण्यासाठी आणला असल्याची प्राथमिक माहिती दिली.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकुर, सहाय्यक फौजदार देवराम कोरम, पोलीस हवालदार राजेश पाटील, पोलीस हवालदार अमोल हंबीर , पोलीस हवालदार प्रशांत दबडे, पोलीस हवालदार विकास खैरनार या पथकाने केलेली आहे.
दिनांक 25/03/2022 रोजी रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना योग्य ती कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड-अलिबाग यांचे अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर,सहाय्यक फौजदार देवराम कोरम, पोलीस हवालदार राजेश पाटील, पोलीस हवालदार अमोल हंबीर , पोलीस हवालदार प्रशांत दबडे, पोलीस हवालदार विकास खैरनार यांचे पथक नेमण्यात आले होते.
सदरबाबत आरोपीत याचेविरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गु.र.नं.80/2022 गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) 20 वैगरे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खोपोली पोलीस ठाणे करीत आहे.
Be First to Comment