माडप कातकरवाडी येथे विविध कार्यक्रम संपन्न
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
आज महिला वर्ग घर सांभाळीत असतांना विविध स्तरावर काम करीत आहे.आजच्या धावपळीच्या युगात महिला सक्षम व्हावे त्यांनी कोणत्याही कामात संकोच येता कामा नये.शिवाय त्या धारिष्ठ व्हावे या दृष्टीकोणातून सेवा सोशल सर्विस सोसायटी करितास इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने माडप कातकरवाडी या ठिकाणी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.येथे विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
सेवा सोशल सर्विस सोसायटी सातत्याने अदिवासी महिला वर्गांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.महिला वर्गांनी स्वताच्या पायावर उभे राहावे यांच दृष्टीकोणांतून विविध कार्यक्रम घेत असतात.यावेळी महिलांनी गरोदर असल्यास घ्यावयाची काळजी यावर देखील मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्वाती चांदेकर (महिला व बालकल्याण, सुपर वायजर ),यांनी सहज आणी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
यावेळी या कार्यक्रमास फादर जस्टिन (सेवा डायरेक्टर), लिजोय जोसेफ(सेवा मॅनेजर) ग्राम पंचायत सदस्य,शारदा कातकरी, ग्राम पंचायत सदस्य कल्पना वाघे, CRP सिमा शेडगे, कार्यक्रमाचे व्यवस्थापक मंगेश भंडारे (प्रकल्प समन्वयक) कर्मचारी वासंती धांदृत, कांचन सावंत, सूरज कानोजोया उपस्थित होते आलेल्या महिला वर्गांसाठी भोजणांची व्यवस्था करण्यात आली.








Be First to Comment