Press "Enter" to skip to content

सरोवरात पोहण्यासाठी तरुणांची लगबग

उकाडा झाला असह्य : नदीच्या ठिकाणी तरुणाईची पोहण्याची उत्सुकता पोहचली शिगेला

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

दिवसें दिवस सूर्यनारायण आपले वृद्र रूप प्रगट करीत असल्याने या प्रखर उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे.या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तालुक्यांच्या ठीकाणी असलेल्या नदी ,तलाव च्या ठीकाणी पोहण्याची गर्दी दाटून येत आहे.

वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे प्रत्येक जण हैराण झाले असून,या रणरणत्या उन्हाचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे यामुळे दुपारी घराबाहेर जाणे अनेकजण टाळत आहे.मात्र घरातील उकाडा सुध्दा असह्य बनत चालला असल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी या नदीतील थंड पाण्याचा आधार घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील असलेले पाणी बाष्पीभवनाच्या स्वरुपात बाहेर येत असल्यामुळे अंगातून अक्षरशा: घामाच्या धारा बाहेर पडत आहेत.सध्या शाळेला सुट्टी पडल्यामुळे शाळेय विद्यार्थ्यांनी तलाव ,नदी यांचा आधार घेतलेला दिसत आहे.वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील मुले पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी मग्न झाले आहे. पोहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. यामुळे शाळेला सुट्टय़ा लागल्याने बालगोपाळांची सुद्धा पोहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.