अनन्य सर्वसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा थाटात संपन्न
सिटी बेल • याकूब सय्यद • नागोठणे •
नागोठणे येथे महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाच्या वतीने अनन्यसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन व जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडा बाजार पटांगणामध्ये संपन्न झाला.
यावेळी नागोठणे शाखा अध्यक्ष याकूब सय्यद यांनी प्रमुख अतिथी यांचे फुलगुच्छ शाल श्रीफळ देवून स्वागत केले. संघाकडून लोकांसाठी लोकोपयोगी होत असलेले आज पर्यंतचे कार्याची संपूर्ण माहिती देऊन संघाचे खरे उद्दिष्ट जनतेसाठी काय आहेत ते उद्दिष्ट सर्वांसमोर आपल्या भांषणात सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले, पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके, नागोठणे ग्रामपंचायत उपसरपंच मोहन नागोठणेकर, तसेच पत्रकार क्षेत्रातील ए. बी. पी माझा च्या अँकर वृषाली यादव, राम प्रहर चे समाधान पाटील, मुंबई सकाळ चे मुंबई ब्युरो चीफ विनोद राऊत, दैनिक सकाळ चे पत्रकार मिलिंद तांबे, रायगड टाइम्स अवृत्तीचे उपसंपाद लक्ष्मण आढाव, हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे वकिल सौ. तमन्ना शेख, इरफान शेख वकील स्वप्निल दिघे, वकील दीपक सोलंकी, ख्यातनाम गायक जगदीश पाटील, हर्षाला म्हात्रे, संतोष चौधरी , सोनाली भोईर,जुईली म्हात्रे, हास्य सम्राट जॉनी रावत, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने लोकसमुदाय जमला होता. भव्य दिव्य असा अनन्यसाधारण व्यक्ती महत्त्व सन्मान सोहळा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयोजक महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे नागोठणे शाखा अध्यक्ष याकूब सय्यद, सचिव संदेश गायकर, खजिनदार प्रवीण बडे, सौ.मंजुळा म्हात्रे, किरण लाड, संजय नागरे, निलेश म्हात्रे, सौ.श्वेता वैशंपायन तसेच सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.








Be First to Comment