चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्त्याच्या कामाची मुख्याधिकारी यांच्याकडून पाहणी
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्त्याचे काम सुरू आहे, रस्त्यांच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे, त्या कामाची पाहणी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

चार फाटा ते श्रद्धा हॉटेल (न्यू बिकानेर) रस्ता खूप खराब झाला होता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती, हा रस्ता व्हावा यासाठी भिसेगाव मधील नागरिकांची मागणी होती, त्यासाठी भिसेगाव मधील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाची पत्र व्यवहार केला होता,याबाबत उपोषण ही करण्यात आले होते, तांत्रिक कारणामुळे रस्त्याचे काम रखडले होते, तांत्रिक अडचण दूर झाल्या नंतर एम एम आर डी ए मुंबई यांच्यामार्फत कर्जत चार फाटा ते श्रद्धा हॉटेल या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 5 कोटी इतका निधी कर्जत नगरपरिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता त्या अनुषंगाने रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
नगरपरिषद हद्दीत असलेल्या चारफाटा ते भिसेगाव (न्यू बिकानेर) या 600 मीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूचे कॉक्रीटीकरण पूर्ण झाले आहे त्याची पाहणी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि शहर अभियंता मनीष गायकवाड यांनी केली.








Be First to Comment