दक्षिण कोरिया येथे होणा-या जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी प्राजक्ता अंकोलेकरची भारतीय संघात निवड
सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •
भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे, दक्षिण कोरिया येथे होणा-या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धा २०२२ साठी नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता प्रकाश अंकोलेकर हिने सहभाग घेतला होता.या निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे तिची ‘वर्ल्ड तायक्वांडो स्पर्धा दक्षिण कोरिया करिता भारतीय संघात निवड झाली आहे.
स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी सराव शिबीर सुरु आहे, या शिबिरात प्रशिक्षण घेऊन प्राजक्ता २१ ते २४ एप्रिल २०२२ दरम्यान होणा-या १२ व्या पुमसे वर्ल्ड तायक्वांडो स्पर्धेसाठी गोयंका दक्षिण कोरिया येथे रवाना होणार आहे., प्राजक्ता हि रायगड व नवी मुंबईची खेळाडू असून गेली २५ वर्षे तायक्वांडोचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच व सात डिग्री ब्लॅक बेल्ट सुभाष पाटील यांच्याकडे घेत असून अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धांमधून तिने सुवर्ण पदके मिळवली आहेत.
भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नामदेव शिरगावकर (सचिव महाराष्ट्र ऑलिम्पिक – असोसिअशन व अध्यक्ष इंडिया तायक्वांडो ) यांनी तिचे विशेष अभिनंदन केले तसेच जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, प्राजक्ताची निवड झाल्यामुळे रायगड तसेच नवी मुंबईतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली कि, सुभाष पाटील सरांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाकडून तसेच सहाय्यक प्रशिक्षक सदानंद निंबरे व प्रभाकर भोईर यांच्याकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे या स्पर्धेत चांगले यश संपादन करण्याचा प्रयत्न करीन, भारतासाठी सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेन.
Be First to Comment