सिटी बेल • कर्जत •
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वाती चिंतामण बोराडे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर सरपंचांच्या निर्णायक मताने स्वाती बोराडे या निवडून आल्या. पीठासीन अधिकारी सरपंच सुनीता मंगेश अहिर यांनी ही निवड जाहीर केली.
२०१९ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीची निवडणूक झाली होती. यावेळी, थेट सरपंचपदी शिवसेनेच्या सुनीता अहिर या निवडून आल्या. मात्र ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी चढाओढ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी, शेकाप, भाजपने उपसरपंच पद घेतल्यानंतर आता उपसरपंच कोण अशी चर्चा होती. त्यातच विकासासाठी एक हाती सत्ता नसल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात होते.
नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत स्वाती चिंतामण बोराडे या निवडून आल्या. यावेळी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दशरथ भगत, ग्रामपंचायत सदस्य विश्वास लोभी, शाखा प्रमुख मनीष भगत, भरत कांबरी, उमेश भोईर, मिलिंद बोराडे, रवी कडव, गणेश बोराडे, विकास भगत, केदार भगत, रुपेश भगत, सरदार कांबरी, मिनार भगत, सदानंद भगत, समीर मिनमीने, सूरज भगत, शुभम लोंगले, चिंतामण बोराडे, महेश राणे आदी उपस्थित होते.








Be First to Comment