Press "Enter" to skip to content

मनोज पष्टे मुख्याधिकारीपदी

कर्जत तालुक्यातील मनोज पष्टे यांची मंचर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नियुक्ति

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत तालुक्यातील रहिवासी मनोज पष्टे हे कर्जत नगरपरिषेद सह खोपोली,अलिबाग, बदलापुर, मुरबाड या ठिकाणी लेखा परीक्षक व लेखापाल म्हणून सतरा वर्ष सेवा बजावली ही सेवा बजावत असतांना त्यांना मुख्याधिकारी बनण्याची इच्छा होती त्या करता ते प्रयत्न करत होते.

अलिकडेच शासनाने दहा टक्के पदासाठी परीक्षा घेऊन पदोन्नती परिक्षा घेऊन नगपालिका, नगरपंचायत कर्मचारी तसेच अधिकारी पन्नोति देऊन मुख्याधिकारी काम करण्याची संधी देण्याचे ठरवले या संधीचे सोने करण्याचे मनोज पष्टे यांनी ठरवले सुरुवाती पासून जिद्दी तसेच मेहनती असलेल्या मनोज यांनी संचालक तथा आयुक्त नगपालिका प्रशासनाने मुंबई विभागीय घेतलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण झाले आणि सोमवार दि. 21 मार्च रोजी मनोज पष्टे यांनी मंचर नगपरिषेदच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली तसेच संध्या निवडणूक लांबणीवर पडल्याने तेथील जिल्हा अधिकारी यांनी प्रशासन म्हणून आणखी एक जबाबदारीवर पष्टे यांच्या खांद्यावर दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.