Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीला यश

अखेर दिशा दर्शक फलकावर हुतात्मा हिराजी पाटील स्मारक मानिवली असे नाव टाकले

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत मुरबाड रोड वरील कळंब पोही येथील एम एस आर डी सी (MSRDC) ने लावलेल्या शासकीय फलकावर “हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक मानिवली”हे नाव देण्यात यावी अशी मागणी कर्जत तालुका,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी केली होती.

कर्जत कळंब रोड वरील पोही येथील एम एस आर डी सी च्या फलकावरील सगुणा बाग हे नाव एम एस आर डी सी ला केलेल्या पत्र व्यवाहारानुसार काढण्यात आले आहे .सदर बोर्डावर “हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक मनिवली “हे नाव देण्यात यावे अशी मागणी दि.7 मार्च 2022 च्या पत्रात करण्यात आली होती. सदर नाव हे 20 दिवसाच्या आत देण्यात यावे असा अल्टिमेटम दिला होता परंतु सदर नाव एम एस आर डी सी कडून अद्याप पर्यंत टाकण्यात आले नव्हते. दि.27 मार्च ला हा अल्टीमेटम पूर्ण होत आहे, 27 मार्च पर्यंत हे नाव टाकले गेले नाही तर राष्टवादी युवक काँग्रेस कर्जत तालुक्याच्या वतीने पोही येथे तीव्र आंदोलन करून सदर फलकावर दि.28 मार्च 2022 या तारखेला हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक मानिवली हे नाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत यांच्या वतीने टाकण्यात येईल असा इशारा एम एस आर डी सी ला कर्जत तालुका,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी दिला होता.

अखेर आज दि.23 मार्च रोजी त्या दिशा दर्शक फलकावर हुतात्मा हिराजी पाटील स्मारक मानिवली असे नाव टाकण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.