विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न
सिटी बेल • पनवेल • विजयकुमार जंगम •
सु. ए. सो. पाली चे के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन आणि गणित दिन साजरा करत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्या सर्व परीक्षांचा निकाल पाहून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे तसेच उत्तेजनार्थ बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण सोहळा शाळेचे प्राचार्य भगवान माळी यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला.


शाळेचे प्राचार्य भगवान माळी, उपप्राचार्य छगन तिरमले, पर्यवेक्षक:- जालिंदर कुंभार, बापुराव महाजन, अजित गोखले, तसेच सर्व विज्ञान शिक्षक यांचे हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले.आणि भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी करोनाचे सर्व नियम पाळून शालेय आणि सहशालेय छोटे खानी कार्यक्रम करीत आहेत. कार्यक्रमाचे छाया चित्रीकरण पत्रकार विजयकुमार जंगम व विजय बडगुजर यांनी केले.

कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र खडतर आणि मंजू राजेशिर्के यांनी केले.













Be First to Comment