दिपक पाटील वर्ल्ड पार्लमेंट फ्लायमेंट एमिसरी अवार्डने सन्मानित
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
युवा ध्येय वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन ( डब्लूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने आयोजित केलेल्या वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिसरी अवॉर्ड 2022 सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना जेष्ठ साहित्यीक यशवंतराव पुलाटे म्हणाले की,दोनशे कार्याचे डब्लूसीपीएद्वारेपेक्षा जास्त देशात पृथ्वी पर्यावरण अर्थात संवर्धन,संरक्षण व विकास या संकल्पनेतून कार्य करणाऱ्या पृथ्वी संसद म्हणजेच डब्ल्यूसीपीएच्या कौतुक करताना समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या धोरणांचा गुणगौरव करताना पुरस्कार म्हणजे कार्याच्या योग्य दिशेच्या प्रवासाची सुरुवात असते असे प्रतिप्रादन केले .
यावेळी चौक वयाळ येथील दीपक गणपत पाटील यांना सामाजिक, पर्यावरण व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वर्ड पार्लमेंट फ्लायमेंट एमिसरी अवार्ड देवून गौरविण्यात आले.दिपक गणपत पाटील हे कानसा वारणा फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक असून राज्यभरातील फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

कोरोना काळात गोरगरीबांना धान्य व किराणा माल,राज्यभर रक्तदान शिबिर, जेलमधील बंदिजनांसाठी कार्यशाळा आदी उपक्रम राबविले आहेत.त्यांच्या कार्यांचा गौरव म्हणून त्यांना वर्ड पार्लमेंट फ्लायमेंट एमिसरी अवार्डने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डब्लूसीपीएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ . दत्ता विघावे यांच्या सुनियोजित कार्यशैलीने कार्यक्रम शानदाररित्या संपन्न झाला . संस्थेचे सचिव बाबासाहेब वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मांडले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव ऋषिकेश विघावे , बरिष्ठ सदस्य सी के भोसले , कोषाध्यक्ष शैलेंद्र भणगे , सदस्या जोत्स्ना थोरात यांनी विशेष सहकार्य केले . तर प्रसन्नकुमार धुमाळ व प्रा . नवनाथ अकोलकर यांनी सुंदर व सुमधूर वाणीने सुत्रसंचलन करत कार्यक्रमाचा गोडवा वाढविला.याप्रसंगी देशभरातून अनेक जण उपस्थित होते .दिपक गणपत पाटील यांना वर्ल्ड पार्लमेंटचा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment