उलवे येथील किरण मढवी यांनी एक हजार सिडबॉल टाकून केला जागतिक वन महोत्सव साजरा
सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (प्रतिनिधी )
१ जूलै ते ७ जूलै हा सप्ताह जागतिक वन महोत्सव हा वन क्षेत्रवाढी करिता पर्यावरणाशी निगडित समाजकार्य करुन सर्वत्र साजरा होत असतो. मात्र या वर्षी कोरोना विषाणुच्या महाभयंकर रोगामुळे आणि जनता कर्फ्युमुळे अनेक पर्यावरण प्रेमींना ह्याची खंत नक्कीच वाटत असेल. तरी देखील उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांनी ह्या वन महोत्सव सप्ताहमधे आपल्या घरच्या घरीच काही बीयांची कुंडीमधे आणि सिड ट्रे मधे लागवड करुन रोप निर्मिती संकल्पाचे कार्य चालुच ठेविले. तसेच त्यांच्या जवळील उपलब्ध सिताफळ, लिंब, कडूलिंब, ईत्यादी बीयांचे १००० सिडबॉल करुन त्यांना उरण तालुक्यातील गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा आणि उलवे नोड येथील रेल्वेच्या रस्त्यांच्या आजूबाजूला हे सिडबॉल टाकून वन महोत्सव साजरा करण्यात आले. समाजसेवक किरण मढवी यांनी आजच्या या कठीण परिस्थितीत देखील निसर्ग संवर्धनाबाबत केलेले हे सेवाभावी कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
Be First to Comment