रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात
सिटी बेल • पेण • मनोज पाटील •
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पेण येथील पतसंस्थेच्या एम.एन.पाटील सहकार भवन येथे अध्यक्ष रविंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
या सभेच्या सुरवातीला पतसंस्थेचे सहसंस्थापक जी.एम.पाटील यांच्या नावाच्या सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते नामकरण करण्यात आले.पथसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक के.पी.पाटील यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेने कर्जावर कमी केलेले व्याजदर,कर्जदार सभासदांना सुरू करण्यात आलेले विमाकवच,२५ लाखापर्यंत सभासदांना केलीली कर्ज मर्यादा आदी विषयांवर उपस्थित सभासदांना सविस्तर माहीती करून दिली.

या सभेच्या वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शिक्षक सभासद तसेच गुणवंत पाल्यांचा रोख रक्कम ,सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या सभेसाठी विद्यमान संचालक पॅनलप्रमुख नरसू पाटील ,सहसंस्थापक जी.एम.पाटील ,बी.पी.म्हात्रे,मिलिंद जोशी ,आर.के.म्हात्रे,डी.आर.मोकल,टी.बी.मोकल,बाबा गडगे ,उपाध्यक्ष नरेश हर्णेकर,सचिव रमाकांत गावंड, खजिनदार रविंद्रसिंग गिरासे ,संचालक के.पी.पाटील,अनिल अंबावले ,प्रदिप मुरूमकर,नरेंद्र मोकल ,राजेंद्र पवार , गणपत शेलार ,दिनेश नागे ,वैशाली गोळे,सुषमा भोपी आदि संचालक व पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.








Be First to Comment