Press "Enter" to skip to content

पत्रकार राकेश खराडे यांचा पाठपुरावा

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते मोहोपाड्यात विकास कामांचे भूमिपूजन

सिटी बेल • रसायनी • प्रतिनिधी •

शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नातून पत्रकार राकेश खराडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नियोजन निधी विकास अंतर्गत शिवनगर येथील समाज मंदिर सभामंडप तसेच मोहोपाडा नवीन स्मशानभूमी बांधकामाकरिता जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गंत विकास कामांचे भूमीपूजन मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते पार पडले.

दरम्यान पत्रकार राकेश खराडे यांनी मोहोपाडा शिवनगर येथील श्री गणेश मंदिर सभामंडपासाठी तसेच मोहोपाडा स्मशानभूमीसाठी वारंवार लेखणी करून मागणी केली होती.

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या ही साठ हजारांपेक्षा जास्त असताना मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मोहोपाडा स्मशानभूमीवर मोठी अडचण उभी होती.काहीवेळा एकाच दिवशी तीन चार मयत झाल्याने अंत्यसंस्कार करताना वाद निर्माण होत असे.यातच बाचाबाची होऊन मारामारीही झाल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत.या स्मशानभूमीवर मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोनच जागा असल्याने मोहोपाडा, शिवनगर,आळी आंबिवली, नविन पोसरी,मोहोपाडा वाडी,शिदींवाडी तसेच आसपासच्या आदीवासी वाड्यांतील मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण येत असल्याने पत्रकार राकेश खराडे यांनी मोहोपाडा स्मशानभूमीजवळ आणखी एक स्मशानभूमी व्हावी यासाठी स्मशानभूमी समस्येवर लिखाण करुन सदर विषय मिडीयावर घेऊन पाठपुरावा केला.

या समस्येकडे माजी आमदार मनोहर भोईर यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजन निधी अंतर्गत निधी मंजूर करुन दिला.मोहोपाडा हद्दीतील दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मा.आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी पत्रकार राकेश खराडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे,माजी उपसभापती गजानन मांडे, उपसरपंच श्वेता कांबळे,वासांबे विभागप्रमुख अजित सावंत, युवासेना अधिकारी संतोष पांगत,वासांबे महिला विभागप्रमुख सद्गुणा पाटील,माजी सरपंच रोशन राऊत,माजी सरपंच शशिकांत मुकादम, जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल राऊत, जेष्ठ शिवसैनिक मारुती खाने, कृष्णा पांगत, शांताराम धुरव, मंगेश पाटील,केदार शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या विकास कामांमुळे शिवनगर, मोहोपाडा, आळी आंबिवली, नविन पोसरी,व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांतर्फे मा.आमदार मनोहरशेठ भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राकेश खराडे यांचे आभार मानले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.