Press "Enter" to skip to content

वाकेश्वर सामजिक सभागृहाचे भूमीपुजन

किल्ला गाव वाकेश्वर मंदिर तिर्थक्षेत्र कसे होईल यासाठी प्रयत्नशील राहू
— खा.सुनील तटकरे

सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •

रोहे तालुक्यातील धाटाव पंचक्रोशीतील आध्यात्मिक इतिहास सर्वत्र ज्ञात आहे.आध्यात्मिक विचारसरणीचा वारसा किल्ला या गावाने अतिशय सुंदररित्या चालविला आहे.येथील वाकेश्वर मंदिराच्या सभोवताली  निसर्गरम्य भूमी दिसत आहे. अनेक वर्षांचे हे मंदीर आणि  या मंदिराची रचना पाहता जणू काही हे शिवकालीन मंदीराप्रमाणे असुन भविष्यात पंढरपुर, आळंदी तिर्थक्षेत्रा प्रमाणे किल्ला हे गाव, श्री वाकेश्वर तिर्थक्षेत्र कसे होईल या करिता प्रयत्नशील राहू  असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यांनी दिले.
 

आ. अनिकेत तटकरे यांच्या स्थनिक विकास निधीतून निर्माण होत असलेल्या वाकेश्वर सामजिक सभागृहाच्या भूमीपुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर आ.अनिकेत तटकरे,तालुकाध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, जेष्ठ नेते शंकर भगत, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, रोहिदास पाशिलकर,अनिल भगत,योगेश बामुगडे, सरपंच नरेश पाटील,अमित मोहिते, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप बामुगडे ,विष्णू लोखंडे, सरपंच रुपेश बामुगडे, जयवंत मुंढे,महेश बामुगडे, केशव भोकटे, अरविंद मगर विभागातील सरपंच उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा.सुनिल तटकरे पुढे म्हणाले या गावचे अनेक वर्षांपासूनचे आपुलकीचे नाते आहे. स्वर्गीय भगवान बुवा बामुगडे, जनार्दन मुंढे यानी राजकारणात  मोलाची साथ दिली. भाईसाहेब या भागाचे नेतृत्व उत्तमरित्या करित होते. पुढे गावच्या विकासाला चालना मिळाली. पाणी प्रश्न सुटला आहे. किल्ला ते अशोकनगर रस्त्याचे प्रश्न मार्गी लागणार आहे. भविष्यात विकासाच्या बाबतीत चिंता करण्याची गरज पडणार नाही. फार वर्षापूर्वी वाकेश्वर मंदीराचे जिर्णोध्दार झाले होते. त्यावेळी उत्पन्न कमी होते. सर्वाच्या त्यागातून हे मंदीर उभे राहिले आहे.या पुढे देखणे असे मंदिर उभे करु, तुम्ही वर्गणी गोळा करा कमी वर्गणी झाली तरी चालेल, पुढे लागतील तेवढा निधी मंदिराकरीता देऊ.असे शेवटी त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रविकांत दिघे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किल्ला  ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण मंडळ तसेच  मंदिर जिर्णोध्दार कमेटीने अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.