श्रीमती पार्वती ( सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे निधन
सिटी बेल • गोवे-कोलाड • विश्वास निकम •
रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीतील गावठण येथील श्रीमती पार्वती (सुंदराबाई ) बाळाराम कदम यांचे वयाच्या ९२ वर्षी वृद्धकाळाने निधन झाले आहे त्यांच्या निधनाने कदम परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .
नावाने पार्वती मात्र या परिसरात सगळ्यांनाच सुपरिचित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुंदराबाई यांनी आपल्या पतीसमावेत पराकष्टा करत संसाराचा गाडा चालवत पारंपरिक पद्धतीचा शेती व्यवसाय त्याला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन म्हणून गाई म्हशींचा सांभाळ करत दुग्धव्यवसायच्या जोरावर कुटूंबाचे सांभाळ केले. धार्मिक आणि आध्यत्मिक क्षेत्राची मोठी आवड तसेच वारकरी संप्रदायाचा कुटूंबात वारसा जोपासत सामाजिक कार्यात अग्रेसर राहत महिलांच्या सर्व विविध कार्यक्रमात नेहमी सक्रिय सहभाग घेणाऱ्या मोठ्या कदम परिवारातील सुंदराबाई यांच्या निधनमुले मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कै.पार्वतीबाई कदम यांच्या पश्चात पाच मुले आणि दोन मुली,पुतणे,सुना, जावई, नातवंडे,पतवंडे, तसेच नात जावई,असा मोठा कदम परिवार आहे.त्यांचे पुढील दशक्रिया विधी बुधवार दि.२३ मार्च व उत्तरकार्य तेरावे शनिवार दि. २६ मार्च २०२२ रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे गावठण येथे विधिवत धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतीने संपन्न होत असून प्रसंगी धामणसई पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार दिनेशभाई कडव (गुरुजी) यांची किर्तनरुपी सेवेतून त्यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत संपन्न होणार आहेत.








Be First to Comment