Press "Enter" to skip to content

शिहू येथे हळदी कुंकू कार्यक्रम

गावाच्या विकासासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे : सरपंच पल्लवी भोईर

सिटी बेल • शिहू • प्रतिनिधी •

येथील ग्रुपग्रामपंचायत शिहू च्या सरपंच पल्लवी भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा शिहू येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पेण पंचायत समिती सभापती मनीषा भोईर, सरपंच पल्लवी भोईर, सदस्या हिरावंती पाटील, शाळा समिती अध्यक्ष हेमंत मोकल, नरेश म्हात्रे, चंदा गदमले, शिक्षिका सुप्रिया पिंगळे, सविता जगताप व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना पल्लवी भोईर म्हणाल्या की हल्ली सर्व क्षेत्रात महिला पुढे आसून , विविध पदे भूषवीत आहेत. एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करता आली पाहिजे तेव्हाच आपण आपल्या समस्या सोडवू शकतो.सहजासहजी महिला घरातून बाहेर पडत नाही, बाहेर पडा,आपल्या गावाच्या विकासासाठी महिलांनी पुढे या अशी कळकळीची विनंती सरपंच पल्लवी भोईर यांनी महिलांना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पिंगळे यांनी केले व आभार जगताप बाई यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.