Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये बच्चे कंपनीची धुलवड जोरात साजरी

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत तालुक्यात पारंपारिक पध्दतीने होळीचा सण साजरा केला जातो, होळी आणि धुलवड हे दोन दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुन विविध रंगाची उधळण करुन धुलवड साजरी केली जाते. परंतु दोन वर्षांपासून जगावर, देशावर कोरोना महामारीचे सावट पसरले होते याचे भान ठेवून शासनाने काही नियम ठरवून दोन वर्षे धुलवड साजरी करण्यात आली होती, मात्र यावर्षी कोरोना महामारीचे सावट कमी असल्याने शासनाने नियम शिथिल केले आहेत त्यामुळे बच्चे कंपनींनी मोठया प्रमाणात धुलवड साजरी करून विविध रंगाची उधळण केली.

कर्जत शहरातील विठ्ठलनगर परिसरातील मुलांनी विविध सुक्या रंगांनी धुलवड साजरी केली.

लहान मुलांना होळीचे वेध अगोदर पासुन लागले असतात बाजारात विक्री साठी आलेल्या विविध प्रकारच्या पिचका-या खरेदीसाठी लहान मुलांचा हट्ट असतो. होळी झाली की दुस-या दिवशी धुलवड साजरी केली जाते, या दिवसाची मुलांसह मोठी माणसेही वाट बघत असतात, आदल्या दिवशी होळीचे किती जागरण झाले तरी लहान मुले सकाळी लवकर उठुन हातात पिचकारी घेऊन धुलवड साजरी करायला बाहेर पडतात, आपल्या हातातील पिचकारीने दुस-याच्या अंगावर रंग उडवत आनंद साजरा करत असतात आणि मग या मध्ये मोठी माणसे, महिला एकमेकांना विविध रंगानी रंगवुन, भिजवून धुलवड साजरी करतात. बच्चे कंपनीं सह मोठ्यांनी एकमेकांच्या चेह-यावर सुके रंग लावून पाण्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात धुलवड साजरी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.