बदलापूर हायस्कुलची २००२ ची दहावीची शाळा पुन्हा भरली
सिटी बेल • बदलापूर •
बदलापूर हायस्कुलचे २००२ मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले विद्यार्थी रविवारी पुन्हा एकत्र जमले होते. अनेक वर्षांची भेटीची ओढ आणि एकमेकांना सहकार्याचा हात देण्याच्या हेतूने या सर्वांची देवळोली येथील फार्महाऊसवर भेट घडून आली. यावेळी, सर्वांनीच आपल्या आठवणींना उजाळा देत धम्माल उडवून दिली.
एकदा शालेय जीवन संपले की विद्यार्थी पुन्हा एकत्र येणे कठीणच असते. त्यातूनच पुढे एकमेकांचे संपर्क कमी होतात आणि हळूहळू आठवणी विस्मृतीत जातात. मैत्रिणींची भेट जवळपास होतच नाही. पुढे कधीतरी काही क्षणांची तरी धावती भेट होते. यातून केवळ आठवणीच जागृत होतात; एकमेकांना सहकार्य ही भावना कमी होत जाते. मात्र शालेय जीवनातील सहकाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने मागील काही वर्षांत ‘गेटटुगेदर’चा ट्रेण्ड सुरू आहे. याच विचारातून बदलापूर हायस्कूलमधील २००२ मध्ये इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. रविवारी या बॅचच्या जवळपास २३ विद्यार्थ्यांनी एकत्र येत एकमेकांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, शाळेचे अरुण पवार सर यांचीही भेट झाली.
यावेळी, हर्षद भोपी, डॉ. महेश पाटील, प्रा. प्रितेश चुंबळे, सुनील नलावडे, गणेश मते, जयवंत क्षेत्रे, वैभव तेलवणे, भूषण तेलवणे, देवदत्त खडकबाण, प्रियंका कोंडलेकर, भावना कुलकर्णी, सुवर्णा दापीलकर, निलांबरी घाटवळ, शिल्पा बिलगी, प्रताप देहेरकर, पद्माकर बंगेरा, जितेंद्र थोरवे, सोनल मरकले, दीपा साळुंके, रुपाली शिंदे, महेंद्र ठाणगे, स्वप्नील लव्हाटे, भरत राऊत उपस्थित होते.








Be First to Comment